धक्कादायक! मुंबई विमानतळावर कचऱ्याच्या डब्यात सापडलं मृत अर्भक, घटनेने उडाली खळबळ..

मुंबई : एकीकडे पुण्यातील दौंड शहरामध्ये एका बरणीमध्ये अर्भक आणि शरिराचे अवयव कचाऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये आढळल्याने खळबळ उडाली या घटनेचा तपास पोलिस करत आहेत, अशातच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या एका शौचालयाच्या कचऱ्याच्या डब्यात मृत अर्भक सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
काल मंगळवारी (ता, २५) रात्री हा प्रकार समोर आला आहे. अर्भकाला कोणीतरी कचऱ्याच्या डब्यात फेकून गेले आहे. बाळ रडत असताना लोकांच्या लक्षात आलं आणि पोलिसांना कळवण्यात आले होते. पोलिसांनी या बाळाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले आहे. हे एक दिवसीय बाळ मृत असल्याची माहितीही समोर आली आहे. सहार पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, काल रात्री १०.३० वाजताच्या सुमारास तिथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने नवजात बाळाला पाहिले. यानंतर, विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांना आणि जवळच्या पोलिस स्टेशनला याची माहिती देण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी बाळाला ताबडतोब रुग्णालयात नेले.
जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर नवजात बाळाला मृत घोषित केले. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मुंबईच्या सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे. नवजात बाळाला कोणी फेकले याचा शोध सुरू आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजात बाळाला कचऱ्याच्या डब्यात कोणी ठेवले हे शोधण्यासाठी ते विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज शोधत आहेत. शिवाय, त्यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
दरम्यान, माहिती मिळताच पोलिस आले आणि त्यांनी बाळाला ताब्यात घेतले आणि रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करताच त्यांनी नवजात बाळाला मृत घोषित केले. मुंबईच्या सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे. हे बाळ कोणी फेकले याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.