धक्कादायक!पुण्यात भाजप राष्ट्रीय प्रवक्त्याच्या आईला कारने जोरदार उडवलं; आरोपी फरार….


पुणे : पुण्यातील सीएनजी पंपावर भाजपा राष्ट्रीय प्रवक्त्याच्या आईला कारनं जोरदार उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर घटनास्थळावरून आरोपी फरार झाला असून आरोपीच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आई सीएनजी पंपावर कारची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी एका कारने त्यांना जोरात उडवले. यानंतर कारचालक फरार झाला आहे. या कारच्या अपघातात त्यांच्या आई गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसानीं या कार चालकाला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी शहजाद पूनावाला यांनी केली आहे.

शहजाद पूनावाला यांनी या अपघातानंतर सोशल मीडियावर अशी पोस्ट केली आहे की, एका माणसाने माझ्या आईला जाणूनबुजून धडक दिली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. आरोपी तिला धडक देऊन पळून गेला. माझ्या आईला लवकरच शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा. या वयात तिच्यासोबत असे घडणे खूप त्रासदायक आहे. मला आशा आहे की पुणे पोलिस त्या माणसाला अटक करतील आणि त्याला योग्य शिक्षा मिळेल.”

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनवाला यांनी त्यांच्या आईला जाणून-बुजून उडवल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!