धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये आयटी इंजिनियर तरुणाला तब्बल 69 लाखांचा गंडा, आरोपीस अटक


पुणे : स्टॉक मार्केट मधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याच आमिष दाखवून पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील वाकड परिसरात राहणाऱ्या एका आयटी इंजिनियरला लाखोंचा फटका बसला आहे. त्याला यामध्ये 69 लाख रुपयांना गंडा लागला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाला सोशल मीडिया आणि ऑनलाईन चॅट ग्रुपच्या माध्यमातून ‘गुंतवणुकीवर दुप्पट नफा मिळेल’ असे दाखवण्यात आले. सुरुवातीला लहान रकमेवर नफा दाखवल्याने पीडिताचा विश्वास बसला. त्यानंतर क्रमाक्रमाने मोठ्या रकमा पाठवण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांने पोलिसात धाव घेतली.
पीडिताने तक्रार नोंदवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपींची नावे सुधांशू कुमार शाहू (ओडिसा) आणि प्रमोद मोहन गरुड (मुंबई) अशी आहेत. विशेष म्हणजे, प्रमोद मोहन गरुड हा स्वतः टॅक्स कन्सल्टंट आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की ऑनलाईन स्टॉक मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गंडा घालणारे टोळके सक्रिय आहेत. त्यामुळे सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!