धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानाला आग, प्रवाशांचा जीव टांगणीला, आपत्कालीन लँडिंग

पुणे : एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे विमान दिल्लीहून इंदूरला जाण्यासाठी निघाले असताच इंजिनमध्ये आग लागल्याची माहिती पायलटला मिळाली आणि याबद्दलची माहिती अधिकाऱ्यांना देत आपत्कालीन लँडिंगची परवानगी पायलटने मिळवल्यानंतर सावधानता राखत विमान सुरक्षित उतरवण्यात आले.यावेळी दिल्ली विमानतळावर ग्राउंड स्टाफला सतर्क राहण्याचे आदेश दिले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान दिल्लीहून इंदूरला निघाले होते. विमानाने टेकऑफ करताच आगीचे संकेत मिळाले. विमानाच्या उजव्या बाजूला असलेल्या इंजिनला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर पायलटने वेळ न घालता याची माहिती अधिकाऱ्यांना दिली आणि तत्काळ लँडिंगची परवानगी मागितली. त्यानंतर लगेचच ही अधिकाऱ्यांनी विमानाला परवानगी दिली आणि इंदूरला निघालेल्या विमानाची लँडिंग दिल्ली विमानतळावर करण्यात आली. यावेळी प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. पायलटने सतर्कता राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान कॉकपिट क्रू मेंबर्सना उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे संकेत मिळाले. पायलटने सर्वात अगोदर ते इंजिन बंद केले आणि विमान सुरक्षित उतरवले. आता या विमानाची तपासणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
