कल्याणमध्ये रिक्षा चालकाचा धक्कादायक कारनामा ; लेकीला भेटायला आलेल्या महिलेला तब्बल 350000 लाखाला लुटले..


मुंबई : कोकणातून कल्याणमध्ये आपल्या मुलीला भेटायला आलेल्या महिलेची रिक्षा चालकाने मोठी फसवणूक केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिक्षात बसलेल्या महिलेची बॅग घेऊन रिक्षा चालक पसार झाला.दरम्यान पोलिसांनी काही तासांच्या कालावधीत या रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून साडे तीन लाखांचे दागिने जप्त केले गेले आहेत. धक्कदायक म्हणजे या रिक्षाचालकाच्या रिक्षावर बोगस नंबर असल्याचं उघड झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी कोकणातून आपल्या मुलींना दिवाळीचा फराळ देण्यासाठी आलेल्या महिलेने डोंबिवलीतील मुलीला भेटून कल्याण पूर्वेकडील दुसऱ्या मुलीकडे जाण्यासाठी निघाली. त्यासाठी सदर महिला रिक्षात बसून टाटा पॉवरजवळ उतरल्यावर काही वेळातच तिला आपली दागिन्यांची पिशवी रिक्षातच राहिल्याचे लक्षात आले.ज्यात साडेतीन लाखांचे दागिने व ३ तोळ्यांचे मंगळसूत्र होते. घाबरलेल्या महिलेने आपल्या मुलीला माहिती दिल्यानंतर तातडीने कल्याण गुन्हे शाखेशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रिक्षा शोधली, मात्र त्या रिक्षात बॅग आढळली नाही.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तपास पुढे नेत लक्षात आणले की, एकाच नंबरच्या दोन रिक्षा शहरात धावत आहेत.वाहतूक पोलीसांच्या मदतीने एका चलानमध्ये त्या रिक्षाचा नंबर आणि मोबाईल नंबर आढळला .मोबाईलच्या नंबर आणि तांत्रीक तपासाच्या आधारे टीटवाळा परिसरात संशयित चालक जयेश गौतम याच्यापर्यंत पोहोचले .त्यांची झडती घेतली असता घरातून बॅग आणि दागिने जप्त करण्यात आले. याचवेळी पोलिसांनी रिक्षाची नंबरप्लेट तपासली असता ती बोगस असल्याचे उघड झाले. आरोपीला अटक करून रिक्षा व दागिन्यांची बॅग ताब्यात घेण्यात आली आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!