नराधम बापाचे धक्कादायक कृत्य!! 3 मुलींवर केले आळीपाळीने अत्याचार, 4 वेळा गर्भपातही केला, घटनेने उडाली खळबळ…

पालघर : पालघर जिल्ह्यातील वसईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका नराधम बापाने आपल्या पोटच्या तीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलीचा पिता हत्येसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याने आपल्याच मुलींवर आळीपाळीने अत्याचार केला आहे.

नालासोपारा पोलिसांनी मुलींचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीचा शोध नालासोपारा पोलीस घेत आहेत. पीडित मुली या सख्ख्या बहिणी आहेत. मुलींचा 55 वर्षीय पिता कुख्यात गुन्हेगार आहे. त्याला ५ मुली आहेत. कोकणातील गावी असताना तो या मुलींवर बलात्कार करत होता. मात्र भीतीमुळे त्या कोणाला याबाबत माहिती सांगत नव्हत्या.


धक्कादायक प्रकार म्हणजे यापैकी एका मुलीचा 4 वेळा गर्भपातही करण्यात आला आहे. पित्याच्या अत्याचारा कंटाळून आई पाचही मुलींना घेऊन नालासोपारा येथे एका नातेवाईकाकडे राहायला आली. या मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, आरोपी फरार असून लवकरच त्याला अटक केली जाईल अशी माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी दिली. ही घटना गंभीर असून आम्ही मुलींची फिर्याद मिळकाच गुन्हा दाखल केला आहे. आता पर्यंतच्या तपासात 3 मुलींवर त्याने लैंगिकअत्याचार केला असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, याबाबत मुलींपैकी मोठी मुलगी 21 वर्षांची असून अन्य दोन मुली या अल्पवयीन आहेत. वडिलांकडून होत असलेल्या अत्याराचाविरोधात तक्रार करण्याचा निर्णय त्यांनी हिंमतीने घेतला, यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
