पुण्यात अपघाताचा थरार; परीक्षेला जाताना गाडीची जोरदार धडक, विद्यार्थिनी सात-आठ फूट हवेतच….


पुणे : पुण्यात एका विद्यार्थिनीला परीक्षेला जात असताना समोरून येणाऱ्या गाडीने जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, विद्यार्थिनी सात-आठ फूट हवेत उडाली आणि रस्त्यावर जोरदार आपटली. पिंपळगाव फाटा परिसरात ही घटना घडली आहे.या अपघातात ऋतुजा चंद्रकांत पारधी (वय 19, राहणार पिंपळगाव-खडकी) गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, ऋतुजा पारधी ही विद्यार्थिनी मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी निघाली होती. परीक्षेला जात असताना तिला समोरून आलेल्या गाडीने जोरदार धडक दिली.धक्क्याची तीव्रता एवढी होती की, ती थेट सात-आठ फूट उंच हवेत फेकली गेली आणि नंतर रस्त्यावर आपटली. या धडकेत तिच्या डाव्या पायाला तसेच टाचेला गंभीर इजा झाली आहे. डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

धडकेनंतर वाहनचालक शरदराव शिंदे यांनी तातडीने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत या घटनेची कोणतीही फिर्याद मंचर पोलिस ठाण्यात नोंदवली गेली नव्हती. ऋतुजाच्या अपघाताने हादरलेल्या आईचे अश्रू अनावर झाले.
माझं लेकरू कसंबसं वाचलं, हेच माझ्यासाठी मोठं आहे. पण पुढचे सहा महिने तिच्या उपचारासाठी घरातच बसावं लागणार आहे. मी रुग्णालयात साफसफाईचं काम करून घर चालवते. आता काम करू शकणार नाही. औषधोपचार आणि संगोपनाचा खर्च जर कारमालकाने उचलला, तर आम्ही पोलिसांकडे जाणार नाही,” असं तिने डोळ्यांतून पाणी ढासळत होतं या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!