धक्कादायक! पुण्यातील प्रतिष्ठित महाविद्यालयात डॉक्टरकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीनं आयुष्य संपवलं..

पुणे : पुण्यातील प्रतिष्ठित बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरकीचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरूणीने मध्यरात्री आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वस्तीगृहात राहत असलेल्या या तरुणीने आत्महत्येचे पाऊल का उचलले? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. मूळची राजस्थानची असलेली ज्योती मुलींच्या वस्तीगृहात राहत होती.मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास वसतिगृहातील तिच्या खोलीत तिने गळफास घेतल्याचे आढळून आले. वसतिगृहातील विद्यार्थीनीच्या ही घटना लक्षात येताच तातडीने पोलिसांना आणि महाविद्यालय प्रशासनाला कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह घेतला. पोलिसांना ज्योतीच्या खोलीमधून कोणताही नोट मिळालेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.पोलिसांनी ज्योतीचा मृत्यदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. दरम्यान ज्योतीने टोकाचे पाऊल का उचलले? ज्योतीची आत्महत्या आहे की हत्या? याबाबत तपास करण्यात येत आहे.
या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून ज्योतीच्या मित्र-मैत्रिणीचे जबाब नोंदवण्यात येत आहे. बीजी मेडिकल कॉलेजकडून तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. ज्योतीच्या मोबाइल फोन आणि वैयक्तिक वस्तूंची तपासणी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.