धक्कादायक! पुण्यात क्लास वन महिला अधिकाऱ्याचे आंघोळ करताना व्हिडिओ काढला, पतीनेच स्पाय कॅमेरा लावला अन्….

पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आपल्या अधिकारी असलेल्या पत्नीवर नजर ठेवण्यासाठी क्लास वन अधिकाऱ्याने घरातच स्पाय कॅमेरा बसवला आहे. यामुळे सगळेच हादरले आहेत. याबाबत सध्या तपास सुरू आहे. त्याने पत्नीचा व्हिडिओ काढून तिला धमकावले आहे.

पत्नीच्या आंघोळीचा व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करत असल्याची माहिती आहे. याबाबत पत्नीने त्या क्लास वन अधिकाऱ्यासोबत सासरच्या सात जणांवर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उघडकीस आल्यावर सगळेच हादरले आहेत. दीड लाखासाठी त्याने हे कृत्य केले आहे.
हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तो अधिकारी त्याच्या पत्नीकडून माहेरून गाडी आणि कारच्या हप्त्याकरिता दीड लाख रुपये आणण्यासाठी जबरदस्ती करत होता. या सगळ्या प्रकाराला पत्नी कंटाळली होती. यामुळे 30 वर्षीय क्लास वन ऑफिसर असलेल्या पत्नीने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे. या घटनेने पुण्यात एकच चर्चा सुरू झाली असून अशी अनेक प्रकरणे बाहेर काढली येत आहेत.
दरम्यान, सतत पैशासाठी त्रास देत होता. सोबतच तिच्यावर नजर ठेवण्यासाठी स्पाय कॅमेरेदेखील घरात बसवून घेतले होते. त्या अधिकाऱ्याला आपल्या पत्नीवर संशय होता. त्यामुळे त्याने घरात स्पाय कॅमेरे लावले होते. यामुळे वाद निर्माण झाला.