धक्कादायक! दौंड तालुक्यात पोलीस असल्याची खोटी बतावणी करून आदिवासी महिलेवर केला अत्याचार..


पुणे : राज्यात महिला अत्याचाराच्या दिवसेंदिवस घटना घडत असताना आता दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथील हाडगळे वस्ती येथे आदिवासी विवाहित महिलेवर अत्याचार झाला असल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. पोलीस असल्याची खोटी बतावणी करून घराची तपासणी घ्यायची असे सांगत महिलेवर अत्याचार केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संतोष दादा हाडगळे असे या नराधमाचं नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला लहान मुलांसोबत घरात असताना सकाळी आरोपी मी पोलीस असून तुझं घर मला तपासायच आहे असे सांगत तो घरात घुसला. त्याने पाठीमागून येऊन विवाहात महिलेला कमरेला धरून बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेने दौंड पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित नराधमाविरुद्ध तक्रार केली.

याप्रकरणी पीडितेच्या तक्रावरून पोलिसांनी संबंधित नरदमावर अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा अधिक तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव दडसे करीत आहेत. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!