धक्कादायक!राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या, शेवटच्या सुसाईड चिठ्ठीत उलगडा

पुणे : राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना आता पुण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एका ५६ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारुख शेख जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सादिक ऊर्फ बाबू बाबर असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.पुण्यातील लष्कर भागात असलेल्या ऑफीसमध्ये गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.आत्महत्या कराण्याआधी सादिक कपूर यांनी त्यांच्या हातावर आणि कागदावर सुसाइड नोट लिहिली होती. यामध्ये अनेकांची नावे आहेत. त्यातील एक नाव अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हडपसर भागातील उमेदवार फारुख शेख यांचे आहे. लष्कर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे..
सय्यद नगर भागातील पाच गुंठे जमिनीच्या वादातून ही आत्महत्या झाली असल्याचं प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीवर आधी मोका कायद्या अंतर्गत कारवाई झालेली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे. या घटनेनंतर हडपसर आणि पुण्यात खळबळ उडाली आहे.

पुणे पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पोलिसांकडून या आरोपात किती तथ्य आहे? याचा तपास केला जात आहे.

