धक्कादायक! शिमल्यात पर्यटकांच्या बसवर दरड कोसळली ; 15 प्रवासी जखमी, महाराष्ट्रातील महिलेचा मृत्यू….


पुणे: हिमाचल प्रदेश येथे पर्यटकांच्या बसवर दरड कोसळल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. यात 15 प्रवासी जखमी झाले असून यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक महिला महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे

सध्या हिमाचलमध्ये पावसाने थैमान घातले असून अनेक नद्यांना पूर आले आहेत. हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यात पर्यटकांची एक बस जात असताना दरड कोसळून दोन भाविकांचा मृत्यू झाला. यापैकी एक महिला महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रहिवासी होती. या दुर्घटनेत 15 पर्यटक जखमी झाले आहेत.दुर्घटनेनंतर त्वरित पोलीस व बचावदल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी प्रवाशांना महात्मा गांधी वैद्यकीय सेवा केंद्र, खानरी (रामपूर उपजिल्हा) येथे तात्काळ दाखल केले. महिलांचे मृतदेह सध्या रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून वैद्यकीय नियमांनुसार शवविच्छेदन करण्यात येईल.

या दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील लक्ष्मी विराणी यांचे निधन झालं आहे.विराणी यांचा मृतदेह त्यांचे कार्यालयीन सहकारी तरुण रामचंदानी यांच्या ताब्यात देण्यात येईल व पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच त्यांचा मृतदेह कागदपत्रांची पूर्तता करून त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!