धक्कादायक! पुण्यातील ‘लाडकी’ च्या पैशावर तब्बल 1200 पुरुषांचा डल्ला; कडक कारवाई होणार?


पुणे : गेल्या वर्षी मोठ्या दणक्यात सुरू झालेल्या लाडक्या बहिणी योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी सरकारकडून कडक पडताळणी केली जात आहे.या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 1200 पुरुषांनी लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता समोर आल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील सव्वा दोन लाख महिलांची पुन्हा थेट पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये तब्बल 1200 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

विशेष म्हणजे, सरकारने लाडक्या बहिणीना ई केवायसी बंधनकारक केली होती. मात्र या महिलांनी ई- केवायसी पूर्ण करूनही त्यांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचा लाभ अडवल्याचे नेमके कारण शोधण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. मात्र या कारवाईतूनच पुण्यातील तब्बल बाराशे पुरुषांनी महिन्याला पंधराशे रुपये चा लाभ घेतला आहे. त्यांच्यावर आता कडक कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली.

आत्तापर्यंत जिल्ह्यातील १,२०१ पुरुष लाभार्थी लाभ घेत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून त्यामध्ये सर्वाधिक हवेली, पुण्यातील ४८७ पुरुष लाभार्थ्यांचा समावेश आहे. आता ‘ई-केवायसी’ झालेल्या लाभार्थ्यांसह ते खरोखरच पुरुष लाभार्थी आहेत का याचाही शोध घेण्यात येणार आहे. त्यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान लाडकी बहीण योजनेचा महिलांप्रमाणे पुरुषही लाभ घेत असल्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे. त्या पुरुष लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!