धक्कादायक! कोल्हापुरात प्रेमी युगलाचा भयानक अंत, घनदाट जंगलात आढळला मृतदेह


कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यात प्रेम प्रकरणातून एका प्रेमी युगुलाने गळफास लावून आपलं आयुष्य संपवल असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत एका अल्पवयीन मुलीचा आणि एका तरुणाचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील ओंकार बर्गे नावाच्या एका तरुणाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी राधानगरीच्या घनदाट जंगलात एकाच झाडाला गळफास घेऊन आपल आयुष्य संपवलं. दोन मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली.

दरम्यान स्थानिक नागरिकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणती चिठ्ठी लिहून ठेवली आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

या तरुण-तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घरच्यांचा विरोधा होता की अन्य काही वैयक्तिक कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!