धक्कादायक! इंदापूर येथील ६ जणांना हजारो मधमाशांचा चावा, ४ जण गंभीर अवस्थेत जखमी, दोघे बेशुद्ध…


इंदापुर : तालुक्यातील सहा जण फिरण्यासाठी वाई तालुक्यातील पांडवगडावर आले होते. यावेळी एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी अचानक मधमाशा खवळल्या आणि हजारो मधमाशा तुटून पडल्या. यात चार जण गंभीर जखमी झाले तर दोघे बेशुध्दावस्थेत होते.

यामुळे मोठा गोधळ उडाला. यावेळी परिस्थिती लक्षात घेऊन अनेकजण पळू लागले. सकाळच्या सुमारास पांडवगडावर ही घटना घडली. जखमींना तातडीने वाईच्या दवाखान्यात आणण्यात आले. याची माहिती वाई पोलिसांना व वाई पंचायत समितीमधील वाई तालुका वैद्यकीय कक्षाला कळवण्यात आली.

यानंतर त्यांनी ५ रुग्णवाहिकांसह धाव घेतली. या घटनेत हजारो मधमाशा चावल्याने अल्हाद दंडवते, निखिल क्षीरसागर, गोपाळ आवटी, गोपाळकर दंडवते व इतर दोन अशी त्यांची नावे आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर वैद्यकीय टीम तातडीने ५ किलोमीटर डोंगर चढून घटनास्थळी पोहोचली.

जखमींचा शोध घेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करून तब्बल पाच किलोमीटर पाऊलवाटेने खाली आणण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेतून वाईच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे. यावेळी गडावर गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, यावेळी वाई पोलिस ठाण्याचे हवालदार श्रीनिवास बिराजदार, डिबीचे विभागाचे नितीन कदम, कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. दिलिप भोजने, नरेंद्र सणस, सी.बी. जाधव, अजित चव्हाण, गीता वाठारकर या वैद्यकीय टीमने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!