धक्कादायक ! ५० फूट उंचावरून बस कोसळून १५ जणांचा जागीच मृत्यू…!
मुंबई : मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खरगोनमध्ये बोराड नदीवरील पुलावरून एक प्रवासी बस तब्बल ५० फूट खाली कोसळली आहे. यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत.
मृतांचा आकडा २० पर्यंत वाढू शकतो. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खरगोन येथील बस दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांसाठी हळहळ व्यक्त केली आहे.
या अपघातात चालक, कंडक्टर आणि क्लिनरचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ही ट्रॅव्हल्स खरगोनहून इंदौरला जात होती. खरगोन-ठिकरी मार्गावर हा अपघात झाला.
बस नदीवरील पुलावरून जात असताना अचानक खाली कोसळली आणि मोठा आवाज झाला आणि गोंधळ झाला. बसमध्ये ३५ हून अधिक प्रवासी होते. दसंगा गावात हा अपघात झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Views:
[jp_post_view]