धक्कादायक! पिंपरीतील सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाचा मृत्यू, आक्रोश अन…

पुणे: पिंपरी चिंचवड शहरात एका बारा वर्षाच्या मुलग्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे.चौवीसवाडी परिसरातील राम स्मृती सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकून या मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरानजीक असलेल्या चौवीसवाडी परिसरात राम स्मृती सोसायटी नावाची एक रहिवासी इमारत आहेत. या इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या दरम्यान एक लिफ्ट अडकल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाली होती. तसेच या लिफ्टमध्ये एका बारा वर्षांचा मुलगा अडकल्याची माहिती देखील अग्निशमन दलाला देण्यात आली.दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून लिफ्टमधून मुलाची सुटका केली. मुलाचा पायापर्यंतचा भाग लिफ्टतच्या दारात अडकला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. हा प्रकार लक्षात येताच मुलाला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लिफ्टमध्ये नेमका काय बिघाड झाला? मुलगा लिफ्टमध्ये कसा अडकला? याचा तांत्रिक तपास पोलीस करत आहेत.
