मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का, आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा शिंदे गटात प्रवेश..
मुंबई : ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे करणार आज दुपारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या रणरागिनी, पीडित महिलांचा आवाज आणि ठाकरे गटाची बाजू अभ्यासूपणे मांडणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख होती.
यामुळेच उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला हा मोठा धक्का समजला जातोय. नीलम गोऱ्हे ह्या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहे.
नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत आहेत.
एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून नीलम गोऱ्हेंकडे बघितले जाते. आजचा त्यांचा निर्णय हा ठाकरे गटातली उरली सुरली नारजी चव्हाट्यावर आणणारा आहे. त्यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाने ठाकरेंना धक्का बसला आहे.
आधी दीपाली सय्यद, मनिषा कायंदे आणि आता नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंना सोडले आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर अनेक नेत्यांनी संजय राऊतांवर खापर फोडलं होतं. आता सुषमा अंधारेंवर महिला नेत्या खापर फोडत आहेत.
काही दिवसांपासून नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा बातम्या सुरु होत्या. मात्र थेटपणे त्यांचे नाव घेतले जात नव्हते. त्यांचा मोबाईलही नॉट रिचेबल येत होता. अखेर नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे स्पष्ट होत आहे.