ठाकरे गटाला धक्का ; तेजस ठाकरेंसह 25 जणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश


पुणे : आगामी स्थानिक स्वराज संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष हे तयारीला लागले आहेत. सध्या विरोधी पक्षातून अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते हे सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच आता ठाकरे गटाला यवतमाळ जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेक माजी नगरसेवक,पदाधिकारी आणि ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यात तेजस ठाकरे यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला.ठाकरे गटाच्या आणि काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे यवतमाळमधील शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला मंत्री संजय राठोडदेखील उपस्थित होते

या पक्ष प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अनेक सरपंच , अनेक जिल्हापरिषद सदस्य , माजी नगराध्यक्ष यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यांचे मी स्वागत करतो. या सर्वांच्या प्रवेशामुळे संजय राठोड यांची विजयी घोडदौड सुरू आहे ती अजून मजबूत होईल. तुमचा खऱ्या शिवसेनेत स्वगृही प्रवेश झाला हे मी जाहीर करतो. त्याचे पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद आणखीन वाढली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात शिंदे गटात प्रवेश केलेल्यांची यादी समोर आली आहे.

*माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक

पवन जयस्वाल: माजी नगराध्यक्ष, नेर
सुनीताताई जयस्वाल: माजी नगराध्यक्ष, नेर
वनिताताई मिसळे: माजी नगराध्यक्ष, नेर
संदीप गायकवाड: नगरसेवक
दिलीप मस्के: नगरसेवक
सरिता मनोज सुने: नगरसेविका
दर्शना लोकेश इंगोले: नगरसेविका (काँग्रेस)
साजिद शरीफ: नगरसेवक

*उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे पदाधिकारी

रिझवान खान: माजी जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्यांक आघाडी
अविनाश देशमुख: शहर समन्वयक, महागाव
तेजस ठाकरे – ठाकरे गटाचा कार्यकर्ता
रूपेश ठाकरे: सवना
अमोल जाधव (पाटील): आमनी
शुभम राठोड: महागाव
निलेश भारती: आमणी (बु.)

*काँग्रेस आणि इतर प्रमुख पदाधिकारी

लोकेश इंगोले: काँग्रेस जिल्हा सरचिटणीस
राकेश नेमनवार: माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी उपसभापती (पंचायत समिती)
संतोष बोडेवार: उपसभापती (पंचायत समिती)
अभय डोंगरे: माजी उपसभापती
गणेश शीलकावार: सामाजिक कार्यकर्ते

*कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि सहकारी संस्था पदाधिकारी

राकेश नेमनवार: संचालक
संतोष बोडेवार: संचालक
अभय डोंगरे: संचालक
विलास ठाकरे: विविध सहकारी संस्था अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक
राहुल देहणकर: विविध सहकारी संस्था संचालक

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!