एकनाथ शिंदेंना धक्का ; विश्वासू नेत्यासह 11 पदाधिकाऱ्यांनी सोडला पक्ष..


पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे सोलापुरातील नेते शिवाजी सावंत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिट्ठी दिली. त्यांच्या या निर्णयानंतर आता जिल्ह्यातील एकूण 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये जिल्हा समन्वयक, उपजिल्हा प्रमुख यांच्यासह वेगवेगळ्या तालुक्यांच्या प्रमुखांचा समावेश आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार असल्याने सर्वच स्थानिक पदाधिकारी पक्षासाठी फार महत्त्वाचे आहेत. कारण या निवडणुका स्थानिक पातळीवर लढवल्या जाणार असल्याने यावेळी तालुका पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका फार महत्त्वाची असते. असे असताना शिंदे गटाला सोलापुरात मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे आता शिंदे यातून मार्ग कसा काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान येत्या दोन ते तीन दिवसांत सर्वच नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका ठरवली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!