कर्नाटकात भाजपला धक्का! 224 विधानसभा जागांपैकी काॅंग्रेस 131 जागांवर आघाडीवर..

कर्नाटक : आज कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकसाठी काॅंग्रेस 131 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 73 जर जनता दल सेक्युलर 18 जागांवर आघाडीवर आहे.
सध्या मतमोजणीला सुरुवात झाली. 10 मे रोजी राज्यातील 224 विधानसभा जागांवर 72.82 टक्के लोकांनी मतदान केले होते. यावेळी एकूण 2,615 उमेदवारांनी निवडणुकीत नशीब आजमावले.
येथे भाजपाची व काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळं संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. आतापर्यत काँग्रेस आघाडीवर असल्याने कार्यकर्ते आनंदात आहेत.
राज्यात मतदानानंतरच्या एक्झिट पोलमध्ये त्रिशंकू विधानसभा होण्याचे संकेत मिळत आहेत. एकूण 10 एक्झिट पोलपैकी 4 एक्झिट पोलनी राज्य़ात काँग्रेसचे सरकार येईल असा दावा केला आहे.
Views:
[jp_post_view]