लाडक्या बहिणींना धक्का! E-KYC ची एक चूक तब्बल २४ लाख बहिणींना महागात, सरकारचा तोडगा काय?

पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.लाखो लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये चुका झाल्याने महिलांचा लाभ बंद झाला आहे. तब्बल 24 लाख महिलांनीं केवायसीत एक चूक केल्यामुळे महिलांना १५०० रुपये मिळाले नाहीत. यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता सरकारने तोडगा काढला आहे.

लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना महिलांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील काही प्रश्नांची महिलांनी चुकीची माहिती लिहली होती. तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरीत नाही ना? या प्रश्नावर लाखो महिलांना येस म्हणजे हो असं उत्तर लिहलं आहे.प्रश्न नीट न समजल्याने महिलांचे उत्तर चुकले. परिणामी त्यांचा लाभ बंद झाला आहे. यामुळेच निकषात बसूनही योजनेचा लाभ बंद झाल्याची तक्रार महिला करत आहे.


आता केवायसीमध्ये प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने लाभ बंद झाला आहे. यावर सरकारने तोडगा काढला आहे. महिलांची आता प्रत्यक्ष केवायसी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. जवळपास २४ लाख महिलांनी चुकीची माहिती दिली आहे. त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.
लाडकी बहीण योजनेत जवळपास सव्वा दोन कोटी महिला लाभ घेत आहेत. सर्व महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. त्याआधी केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद केला आहे. आता चुकीच्या प्रश्नाचं उत्तर दिल्यामुळे अंगणवाडी सेविका आता बहिणीच्या मदतीला धावणार आहेत
