Shoaib Malik : सानिया मिर्झासोबत घटस्फोट? माजी क्रिकेटपटू शोएब मलिक पुन्हा अडकला विवाहबंधनात..


Shoaib Malik : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक विवाहबंधनात अडकला आहे. शनिवारी सकाळी त्याने आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला, शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, घटस्फोटाबाबत स्पष्ट काही माहिती समोर आली नसताना आता शोएब मलिकने लग्न केल्याचे समोर आले आहे.

सोशल मीडियावर सना जावेदसोबतचे लग्नसोहळ्याचे फोटो त्याने शेअर केले आहेत.शोएबने सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत छान कॅप्शन लिहिलं आहे. त्याने लिहिलं आहे,”अलहमदुलिल्लाह”. शोएबने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. लग्नसोहळ्याच्या फोटोंमध्ये शोएब आणि सना खूपच आनंदी दिसत आहेत.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा २०१० मध्ये लग्नबंधनात अडकले होते. सानियाला इजहान नावाचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून शोएब आणि सानियाचं बिनसलं असल्याची चर्चा आहे. तसेच त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्याही चर्चा सुरू होत्या.

दोन दिवसांपूर्वीच सानिया मिर्झाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने लिहिले होते की, घटस्फोट घेणे खूप कठीण आहे आणि लग्न करणे देखील खूप कठीण आहे. Shoaib Malik

त्यानंतर कदाचित शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचा घटस्फोट झाला असल्याचे संकेत मिळत होते. गेल्या एक वर्षापासून अशा अफवा सुरू होत्या की, दोघांमध्ये काही ठीक नाही आणि ते वेगळे होऊ शकतात, ज्याला आता पुष्टी मिळाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!