शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य म्हणाले, मी या भानगडीत…
मुंबई : राज्यात सध्या नवीन राजकीय समीकरणे जुळू लागली आहेत. यामध्ये सध्या शिवसेनेच्या ठाकरे गटाची आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत माहिती ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी माहिती दिली. असे असताना आता या युतीबाबत काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली आहे.
यामुळे ही युती शरद पवारांना मान्य आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर यावर आता निर्णय झाला आहे.
याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सांगितले की, शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीबाबत बोलणं झालं असून उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करावी अशी आमची भूमिका आहे.
तसेच सध्या युतीबाबत ठाकरे गट आणि काँग्रेस, राष्ट्रवादीत चर्चा सुरू आहे. सर्वांनी एकत्र मिळून युतीबाबत घोषणा करावी, असे उद्धव ठाकरेंचे मत आहे, मात्र असे असताना शरद पवारांनी जी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून आता ते या युतीसाठी अनुकूल आहेत की नाही असा प्रश्न आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी दुपारी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती दिली. याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.