Shivsena MLA : शूटर्सना सुपारी दिली, तारीखही ठरली अन्….!! शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट उघड, भयंकर माहिती आली समोर

Shivsena MLA : शिवसेना शिंदे गटाचे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.

ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शहरातील शिवसेनेच्याच दोन जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
सविस्तर माहिती अशी की, अंबरनाथ शहरात शिवसेनेत २ गट असून याच गटबाजीतून किणीकर हे चौथ्यांदा निवडून आल्यानंतर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत.

याच लग्न सोहळ्यात २६ डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वतः आमदार किणीकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. Shivsena MLA
दरम्यान, या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून २ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या चौकशीनंतर शहरातील शिवसेनेच्या २ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.