शिवसेनेचा कोहिनूर हिरा हरपला, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन


Manohar Joshi passed away । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एक दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

 

पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जोशी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे मनोहर जोशी यांचा मुलगा उमेश यांनी सांगितले. त्याआधी त्यांचे पार्थिव माटुंगा येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. (Manohar Joshi passed away)

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!