शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! शिवनेरीकडे जाणाऱ्या मार्गांवर सरकारकडून टोलमाफी…!


नवी दिल्ली : जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. राज्य सरकारतर्फेही शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थिक राहणार असल्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शिवभक्तांनी टोलमाफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना टोलमाफ करण्यात आला आहे. शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी करण्यात आली आहे. यामध्ये खालापूर, तळेगाव, खेड, राजगुरुनगर टोलनाक्यावर टोलमाफी असेल सरकारकडून घोषित करण्यात आलं आहे.

‘शिवकालीन गाव’ हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून या वर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चे आयोजन करण्यात आले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 393 वी जयंती साजरी होत आहे.

त्याचबरोबर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राची ओळख जगभरात पोहोचली आहे. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेले गड-किल्ले जगभरातील पर्यटनप्रेमींचे मुख्य आकर्षण आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!