Shivani Agarwal : पोलीस कोठडीत त्रास होतोय, कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवालची तक्रार, नेमकं काय झालं?

Shivani Agarwal : रक्त नमुने बदल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी मुलाची आई शिवानी अगरवाल सध्या पोलीस कोठडीत आहेत. शिवानी हिला फरासखाना पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

कोठडीत अस्वच्छता आहे, त्यामुळे या अस्वच्छतेमुळे त्रास होत असल्याची तक्रार शिवानीने न्यायालयात केली. या तक्रारीची दखल न्यायालयाने घेतली आहे. वकिलांमार्फत न्यायालयात तक्रार नोंदवावी असे आदेश देण्यात आले आहेत.
याच गुन्ह्यात ससूनच्या सध्या ससुनचे दोन डॉक्टर व शिपायाला तसेच अगरवाल दाम्पत्याला अटक केली असून ते पोलिस कोठडीत आहेत. Shivani Agarwal

पुण्यातील कल्याणीनगर येथे विशाल अगरवाल या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने आलीशान पोर्शे कार भरधाव वेगात चालवत दोघांना चिरडले होते. हा प्रकार झाल्यावर त्याला अटक करून त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससुनमध्ये नेण्यात आले होते.
Views:
[jp_post_view]