शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का ; जिल्हाप्रमुखांचा अजित पवार गटात प्रवेश…


पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष, आणि मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राजेखान जमादार यांच्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हे दोन्ही पक्षप्रवेश पार पडले आहेत.

एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढवणार असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून स्वबळाचे संकेत देण्यात आले होते, त्यातच महायुतीच्या घटक पक्षातील नेते देखील एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता आता निर्माण झाली आहे. या निवडणुकीआधीच शिंदे सानेला मोठा धक्का बसला आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची या महापालिका निवडणुकीसाठी युती होणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!