शिवसेनेच्या पक्ष प्रमुखपदी एकनाथ शिंदे ; चर्चांना उधाण…!
शिवसेनेची आज पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक
मुंबई : शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आज शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणीची पाहिली बैठक होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षप्रमुख पदी निवड होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर होणाऱ्या या राष्ट्रीय कार्यकारणीच्या पहिल्या बैठकीमध्ये नवीन पदाधिकारी निवडले किंवा नियुक्त केले जाऊ शकतात, अशी माहिती देखील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेच्या पक्ष प्रमुख पदाची जबाबदारी कोणाकडे देण्यात येणार या बाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांची या पदावर नियुक्ती होवू शकते, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे.