शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरेंच्या ड्रायव्हरचा’ हिबानामा’ गोत्यात ; 231 कोटी प्रकरणी अटकेची टांगती तलवार..


पुणे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आलेले शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांचा चालक जावेद शेख याच्या ‘हिबानामा’ प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चालकाने केलेल्या 231 कोटी रुपयांच्या हिबानामाप्रकरणी गुन्हा दाखल झाला. आता या प्रकरणात अटकसत्र देखील सुरू झाल आहे. मीर मेहमुदअली बशारत अली खान याच्या अटकेनंतर आता चालक जावेद शेखवर देखील अटकेची टांगती तलवार आहे.

बहुचर्चित छत्रपती संभाजीनगरजवळील नऊ एकर जमीन बक्षीस म्हणून देण्यात आल्याचा प्रकार गेल्यावर्षी जून महिन्यात समोर आला होता. यां सर्व प्रकरणात मीर महेमुदअलीची भूमिका महत्त्वाची होती. मीर महमूद अलीखानने एकाच जागेचे दोन लोकांना हिबानामा करून दिल्याचा आरोप आहे. यात एक हिबानामा संदिपान भुमरे यांचा चालक जावेद शेखला करून देण्यात आला आहे.याच हिबानामाप्रकरणी शहर पोलिसांनी आता फास आवळायला सुरुवात केली आहे.

त्यानुसार परभणीचे वकील मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून मीर महमूद अली खान आणि जावेद शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी मीर महमूद अली खानला अटक केली आहे. हैदराबादच्या मालकांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केला आहे त्यानंतर आता भूमरें चा चालक जावेद शेखवर देखील अटकेची टांगती तलवार आहे.

.हे प्रकरण हिबानामाचे असले तरी यावरून राजकीय वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन आता अटक सत्र सुरू झाले आहे. याचं कारण म्हणजे सत्ताधारी खासदार आणि त्यांचा आमदार पुत्राची लींक असताना कारवाई होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!