पश्चिम हवेलीतील शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ लांडगे यांचे निधन
पुणे : शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ शंकरराव लांडगे (वय५६) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले आहे. हवेली तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिवसेनेचे आक्रमक व जुने नेतृत्व म्हणून हरपले आहे.
सोमनाथ लांडगे हे खानापूर- खेड-शिवापूर या गटातून ते जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले होते. तसेच ते पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्यही राहिले होते.
त्यांचे मूळ गाव हे पश्चिम पट्यातील श्रीरामपूर हे असून त्यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर हवेलीच्या पश्चिम पट्ट्या वर शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे आई, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा मोठा परीवार आहे.
Views:
[jp_post_view]