Shirur : शिरूर – हवेली विधानसभेचा अधिकृत निकाल दुपारी अडीच वाजेपर्यंत अपेक्षित! एकूण वीस फेऱ्यांचा कल टप्पा -टप्यानुसार होणार जाहीर…


 जयदिप जाधव

Shirur उरुळीकांचन : शिरूर-हवेली मतदारसंघात उद्या (ता.२३ ) होणाऱ्या मतमोजणीसाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. उद्या एकूण होणाऱ्या प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून एकूण वीस फेऱ्यांत होणाऱ्या मतमोजणीची प्रक्रिया दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पूर्ण होण्याची शक्यता असून अंतिम निकाल तीन सुमारास अधिकृत जाहीर होण्याची शक्यता आहे.

१९८ शिरुर मतदारसंघाची मोजणी उद्या कारेगाव -वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. पहिल्या फेरीत टपाली मतमोजणी होऊन सकाळी ९ वाजता ईव्हीएम मशीन यंत्रातील मोजणी होणार आहे. एका फेरीचा मतमोजणीचा कालावधी २० मिनिटांचा असणार असून प्रत्येक फेरीचा कल निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर करणार आहे. त्यामुळे साधारण अडीच वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

शिरुर -हवेली मतदारसंघात एकूण २० फेऱ्यांत ११ फेर्‍या शिरुर तालुक्याच्या असणार आहे. तर ९ फेऱ्या हवेली तालुक्याच्या असणार आहे. पहिल्या फेरीच्या मोजणीत शिरुर परिसर , त्यानंतर न्हावरा परिसर, मांडवगण फराटा परिसर, तळेगाव शिक्रापूर परिसर अशा मतपेट्या मोजून हवेलीत मतमोजणी होणार आहे.

शिरुर मतदारसंघात एकूण एकूण ६८.९१ टक्के मतदान झाले असून ३,२१, १८० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तालुकानिहाय शिरूर तालुक्यात ७३.३२ टक्के मतदान झाले आहे तर हवेली तालुक्यात ६५.१९ टक्के मतदान झाले आहे. शिरूर-हवेली मतदारसंघात ४,६६०४२ मतदारांपैकी ३,२११८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १,६९,९०३ पुरुष मतदार तर १,५१,२६९ महिला मतदार तर ८ इतर मतदारांनी मतदान केले आहे.

मतदारसंघातील शिरूर तालुक्यामध्ये २१३ मतदार केंद्रामध्ये १,५६४७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. हवेली तालुक्यामध्ये २४४ मतदान केंद्रांमध्ये १,६४७०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. शिरूर तालुक्यापेक्षा हवेली तालुक्यामध्ये मतदारांची संख्या अधिक असल्याने स्वाभाविकपणे हवेली तालुक्यात ८२२४ मतदान केलेले मतदार शिरूर तालुक्यापेक्षा अधिक आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर-हवेली विधानसभेत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असून ११.५९ टक्के अधिकचे मतदान या विधानसभा निवडणुकीत झाले आहे.

दरम्यान शिरुर- हवेली मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आ. अशोक पवार तर महा युतीकडून ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके हे निधडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. प्रत्येक निवडणुकीत ‘भाकरी फिरविण्याची’ परंपरा या मतदारसंघात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारची ताकद वापरुन विजयी मिळविण्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्ठा झाली आहे. घोटाळा , अपहरण, गुंडगिरी, भ्रष्टाचार हे आरोप लावून मैदान मारण्याचे प्रयत्न झाले असले तरी मतदार कोणत्या पहिलवानी डावपेचाला संधी देणार म्हणून जिल्ह्याचे लक्ष या मतदारसंघावर लागून राहिले आहे.

आतापर्यंतच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदान व टक्केवारी…

२००९ – ६४.२८ टक्के (२,८५१२९)
२०१४ – ६९.६४ टक्के (३,१०४८९)
२०१९ – ६७.३१ टक्के (३,८४३२३)
२०२४ – ६८.९१ टक्के (४,६६०४२)

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!