Shirur News : शिरूर शहरात सराफ पेढीवर गोळीबार, घटनेने उडाली खळबळ..


Shirur News : शिरूर शहरातील मध्यवस्तीत सुभाष चौक येथे मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी सराफ पेढीवर गोळीबार करत चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. शहरातील भर बाजारपेठेत रविवारी (ता. २८) रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या या प्रकारानंतर खळबळ उडाली आहे. चोरट्यांच्या झटापटीत कामगार जखमी झाला.

भिकाजी एकनाथ पंडित (वय ५०, रा. शिरूर) असे चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कामगाराचे नाव असून, त्यांना येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,शिरूर शहरातील सुभाष चौकात अशोक जगन्नाथ कुलथे सराफ या नावाचे माजी नगराध्यक्ष अशोक कुलथे यांचे दुकान आहे. त्या दुकानात भिकाजी पंडित हे कामाला आहेत. संध्याकाळी साडे आठच्या सुमारास मोटारसायकलवरुन आलेले व मास्क घातलेले दोन जण दुकानात शिरले. त्यानंतर, चोरीच्या उद्देशाने त्यांनी प्रयत्न करताच चोरट्यांशी प्रतिकार करणारे पंडित हे जखमी झाले. यावेळी चोरट्यानी गोळीबारही केला. Shirur News

दरम्यान., गोळीबाराच्या आवाजाने आसपासच्या दुकानदारांनी कुलथे यांच्या पेढीकडे धाव घेतली असता, चोरट्यांनी पुन्हा हवेत गोळीबार केला व ते विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून भरधाव वेगात पळून गेले

गोळीबाराच्या आवाजाने परिसरात घबराट उडाली. मोठ्या संख्येने नागरिकांनी कुलथे यांच्या दुकानासमोर धाव घेतली. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तातडीने नाकेबंदी केली. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजही तपासले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!