Shirur News : ‘घोडगंगा’ कारखाना बंदमुळे शेतकऱ्यांचे नुकसान! अध्यक्ष व माजी अध्यक्षांच्या चौकशीची मागणीसाठी कारखान्यावर आमरण उपोषणाचा इशारा….!!

Shirur News शिक्रापूर : न्हावरे (ता.शिरुर) येथील घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामासाठी अद्याप सुरु झाला नाही. कारखान्याचे ऋषीराज पवार, कारखान्याचे माजी अध्यक्ष व शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार हे कारखाना सुरू होणार की नाही, म्हणून उत्तरे देत नाहीत. तसेच कारखान्याच्या सर्व अर्थिक व्यवहारांची माहिती मिळण्यासाठी कारखान्यावर उपोषण करणार असल्याचे निवेदन भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी साखर आयुक्त चंद्रकात पुलकुंडवार यांची भेट घेऊन घोडगंगा सहकारी साखर कारखाना संदर्भात आंदोलनाचे निवेदन यांना दिले आहे.
या निवेदनात शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात सुरू होऊ न शकल्याने या कारखान्यावर २० हजार सभासद शेतकरी अडचणीत आल्याचे म्हटले आहे. कारखाना बंद ठेऊन अध्यक्ष ऋषीराज पवार ,उपाध्यक्ष व संचालक मंडळ हे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कारखान्याबाबत सद्यस्थिती लपवत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. Shirur News
तसेच या गळीतासाठी शेतकऱ्यांच्या उसाच्या नोंदी नाहीत, ऊसतोड मजूर, वाहतुकदार यांचे करारनामे नाहीत. या सर्व परिस्थितीने उस उत्पादकांचे मोठे नुकसान करुन सभासदांना उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप करीत कारखान्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार झाल्यामुळे सर्व व्यवहारांची चौकशीची मागणी निवेदनात केली आहे.
कारखान्याचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष यांनी स्वतःचा खाजगी कारखान्यासाठी सहकारातील ‘घोडगंगा’ कारखाना बंद पाडण्याचा कट रचुन असून घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पाडण्यात येत आहे का याचीही सविस्तर चौकशी झाली पाहिजे. असे म्हटले आहे.
कारखान्यावर नेमके कोणत्या बॅंकेचे किती कर्ज आहे.? कोणाकोणाची किती देणी आहे याबाबत सभासदांना कोणतीही माहिती दिली जात नाही. साखर आयुक्त यांनी याबाबत तातडीने शेतकरी सभासदांना सत्य माहिती देण्याची व्यवस्था करावी.
यामुळे चेअरमन व संचालक मंडळ यांच्या विरोधात शेतकरी सभासद म्हणजे कारखान्याचे मालक यांचा विश्वासघात, फसवणूक केली असल्याने त्यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होणे आवश्यक असुन संचालक मंडळ बरखास्त करून कारखाना साखर आयुक्त यांनी ताब्यात घेऊन तेथे तात्काळ प्रशासक नेमुन कारखाना सुरू करणेबाबत निर्णय घेणे आवश्यक वाटते.
घोडगंगा कारखान्याने गत गळीत हंगामाची शेतकऱ्यांच्या ऊसाची एफ. आर. पी. ची संपुर्ण रक्कम थकीत ठेवली आहे. कामगारांची देणी थकीत आहेत. तसेच चालू गळीत हंगाम अद्याप कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार, माजी अध्यक्ष आमदार अशोक पवार यांनी अद्याप कारखाना सुरू केला नाही. तसेच हा कारखाना सुरू होणार कि नाही? याबाबत शेतकरी सभासदांना कोणतीही सत्य माहिती दिलेली नाही. हा सभासदांचा विश्वासघात आहे.
अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी सहकार कायद्याचे, कामगार कायद्याचे उल्लंघन केले आहे. तसेच कारखान्याच्या कर्जाची रक्कम कुठे खर्च करण्यात आली? आर्थिक भ्रष्टाचार कोणी केला याची खरी माहिती समजण्यासाठी कारखान्याच्या संपुर्ण बॅंक खाती, सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच आजी, माजी अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या आर्थिक व्यवहारांची, संपत्ती ची चौकशी होणे आवश्यक आहे.
तरी साखर आयुक्त यांनी याबाबत स्वतःचे अधिकार वापरून योग्य तो निर्णय घ्यावा व आवश्यक वाटल्यास राज्य शासन, सहकार मंत्री, मुख्यमंत्री यांना याबाबत तातडीने पत्र व्यवहार करावा व घोडगंगा सहकारी साखर कारखाना कायमस्वरूपी वाचविण्यासाठी निर्णय घ्यावा. यासाठी दिनांक २७ डिसेंबर २०२३ पासुन घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे समोर धरणे व आमरण आंदोलन सुरू करत आहोत असे या निवेदनात म्हटले आहे .