Shirur News : शिरुर पंचक्रोशीवर पाचर्णे गटाचा दबदबा कायम! पाचही ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा..!!


Shirur News :  शिरूर तालुक्यातील शिरुर पंचक्रोशीतील पाचही ग्रामपंचायतीवर पाचर्णे यांच्या गटाने पुन्हा एकदा निर्विवाद प्रस्थापित केले आहे. सर्व ग्रामपंचायतीवर माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे व माजी नगरसेवक नितीन पाचर्णे यांच्या समर्थकांनी बाजी मारली आहे. Shirur News

स्व. माजी आमदार यांचे होम पीच असलेल्या शिरूर पंचक्रोशीत पाचही ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविला आहे. त्यांच्या स्वतःच्या तर्डोबाची वाडी या ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदी जगदीश भागचंद पाचर्णे हे मोठ्या मताधिक्याने विराजमान झाले आहेत. राजकारणात अनेक वर्षांपासून स्व. बाबुराव पाचर्णे यांना या भागाने मोठी साथ दिली आहे. Shirur News

पाचर्णे यांच्या निधनानंतर पहिल्याच निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे व नगरसेवक नितीन पाचर्णे यांनी या भागात धुरा संभाळली आहे. ग्रामपंचायतच्या निवडणूक पार पडत असल्याने या ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते.

तर्डोबाचीवाडी, शिरुर (ग्रामीण), कर्डेलवाडी, आण्णापूर, सादलवाडी या सर्व पाचही ग्रामपंचायतीचे सरपंचपद पाचर्णे यांच्या गटाला मिळाले आहे. तर्डोबाचीवाडी ग्रामपंचायतीत भाजपच्या जगदीश पाचर्णे यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी समर्थक संभाजी कर्डिले यांचा दारुण पराभव केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!