Shirur : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करुन मारहाण, मागितली १० कोटींची खंडणी, घटनेने उडाली खळबळ..

Shirur : शिरुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
सविस्तर माहिती अशी की, आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र व रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार (वय. २६) यांचे एका टोळीने अपहरण करून मारहाण केली. हे अपहरण १० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी केल्याची माहिती मिळाली आहे. Shirur
शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून अशोक पवार उभे राहिले आहेत. तर वडिलांसाठी ऋषीराज पवार हे मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे प्रचार करीत होते.
दरम्यान, यावेळी ५ ते ६ जणांच्या टोळक्याने त्यांचे अपहरण केले. व त्यांना १० कोटींच्या खंडणीसाठी विवस्त्र करून मारहाण केली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.