Shirur : शिरुर-हवेलीत महायुतीचे उमेदवार माऊली कटकेंचा उमेदवारी अर्ज दाखल, शक्तिप्रदर्शन करीत केला उमेदवारी अर्ज दाखल..


Shirur शिरूर : शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे व महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोठे शक्तिप्रदर्शन करीत माऊली कटकेंनी आपला अर्ज दाखल केला आहे.

शिरुर तहसिल कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी संगिता राजापुरकर यांच्या कडे उमेदवारी अर्ज सुपुर्द केला .या वेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील घोडगंगाचे संचालक दादा पाटील फराटे, राहुल पाचर्णे, रविंद्र काळे,महेश ढमढरे , भगवान शेळके , रामभाऊ सासवडे, अरुण गिरे , नवनाथ काकडे, राजेंद्र जासूद, स्वप्निल गायकवाड, सुधीर फराटे उपस्थित होते. Shirur

महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचें उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून भव्य रॅली काढली होती. अर्ज दाखल केल्या नंतर कापड बाजार येथे जाहीर सभा घेण्यात आली त्या वेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!