Shirur : शिरुर- हवेलीत आयकर विभागाचे धाड सत्र! एका सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षासह पैलवान, डेव्हलपर्स सावकारावर आयकरचा छापा…


Shirur : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेलीतुन महत्वाची माहिती समोर आली आहे. Shirur

पूर्व हवेलीतून एका बड्या राजकीय नेत्यासह आठ प्लॉटिंग व्यवसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिरूर तालुक्यातील एका सावकारावर देखील छापे टाकल्याचे पुढे येत आहे.

दरम्यान, एक सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष, एक चित्रपट फायनान्सर, शिरुर तालुक्यातील एक बडा सावकार व काही प्लॉटींग व्यावसायिकांवर छापे टाकण्यात असल्याची माहिती आहे. तसेच आयकर विभागाकडून पुढील कारवाई सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!