Shirur : पत्नीचे हृदयविकाराने निधन झाले, दुःखात असलेल्या पतीनेही संपवलं आयुष्य….
Shirur : पत्नी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याने नैराश्यात गेलेल्या पतीने देखील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी परिसरात शोककळा पसरली आहे.
शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी गावातील जयेंद्र सुभाष शिंदे या ४५ वर्षीय शेतकऱ्याने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीचा अचानक मृत्यू झाल्याने जयेंद्र हे नैराश्यात होते असे सांगितले जाते.
सविस्तर माहिती अशी की, महिन्यापूर्वी छाया जयेंद्र शिंदे या देवदर्शनासाठी जात असताना, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने पती जयेंद्र यांना मोठा धक्का बसला. ते नैराश्यात गेले. Shirur
दरम्यान, ११ जुलै रोजी सकाळच्या वेळी अचानक जयेंद्र घरातून निघून गेले. त्यांचा शोध नातेवाईकांनी घेतला, तेव्हा शेतातीलच आंब्याच्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. याप्रकरणी निमगाव महाळुंगी परिसरात शिक्रापूर पोलिसांनी भेट दिली व अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.