Shirur : हवेलीत ‘यशवंत’ नंतर शिरुरच्या ‘घोडगंगा’त आरोपांचा नवा अध्याय सुरू! खोटे नेरेटिव्ह की, वास्तविकता अजित पवारांकडून उत्तर अपेक्षित..!!

जयदीप जाधव

उरुळी कांचन : शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ”एनसीडीसी” या केंद्रीय सहकार विकास निगमच्या अर्थिक कर्जाच्या पॅकेजच्या प्रस्तावात त्रुटी काढल्याचा कारणावरून कारखान्याला पॅकेज नाकारल्याचा आरोप स्वतः हा अशोक पवार यांनी लोकसभा निवडणुकीत तर यांच्या समर्थकांकडून सोशल मिडीयातून सुरू झाला आहे. या आरोपावरून मतदारसंघात पध्दतशीरपणे अजित पवार यांना लक्ष्य करुन वातावरण पेटविले जात आहे. मात्र खरंच अजित पवार प्रस्तावाला विरोधात आहेत की, अजित पवार यांच्या विरोधात प्रस्तावावरुन खोटे नेरेटिव्ह तयार केले जात आहे. या प्रकरणात खरी वास्तविकता काय आहे ,म्हणून शिरुर-हवेली मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली जात आहे. या आरोपांना अजित पवार उत्तर देणार काय म्हणून जनतेला उत्तर अपेक्षित आहे.
प्रथम हवेली तालुक्यातील ”यशवंत”कारखान्यानंतर शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना अडचणीत आला आहे. परंतु यशवंत सहकारी साखर कारखाना राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध सत्तेत असताना चालू अवस्थेत बंद झाला आहे. त्यावेळी पासून आज पर्यंत कारखान्याला मदत मिळाली नाही, हवेलीच्या सभासदांत ही सल कायम आहे. निवडणूक आली की, ‘यशवंत’ चा प्रश्न राजकीय पोळी भाजण्यासाठी नेतेमंडळींना करीत आले आहेत मग निवडणूक संपली की, हा ज्वलंत विषय हवेत विरघळला जात आहे. मात्र आता परत विधानसभेची निवडणूक चार महिन्यांवर आली आहे आणि मतदारसंघातील कारखाना बदलला पण आरोप तेच आहेत, मग वस्तुस्थिती काय म्हणून चर्चेला सुरुवात झाली आहे.

यशवंतच्या बाबतीतही १४ वर्षे आरोपांचा सिलसिला अद्याप सुरू असून कारखान्याला कोणतेच राज्य सरकार मदत करत नाही ही वास्तविक भूमिका सभासदांनी अनुभवली आहे. मग ‘यशवंत’ नंतर पुन्हा तेच आरोप म्हणून जनतेला अजित पवार यांच्याकडून उत्तर मिळेल काय ? ही अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे. Shirur
हवेली तालुक्यातील ”यशवंत” व हवेली बाजार समिती या सहकारी संस्था अनेक वर्षे प्रशासकीय जोखडात ठेऊन यशवंत कारखान्याच्या निर्णयात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप अनेक वर्षे सुरू आहे. एवढेच नाही तर या संस्थेच्या जागेवर बड्या नेत्याचा डोळा असल्याचा आरोप झाले आहेत. ६ वर्षे कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रणीत आघाडी सरकार व त्यानंतर युतीचे ६ वर्षे सरकार राज्यात सत्तेत असताना ‘यशवंत’च्या बाबतीत राज्यकर्ते सकारात्मक नसल्याची वस्तुस्थिती आहे. तर हवेली बाजार समितीला उच्च न्यायालयातून प्रशासक राजवट संपवून संस्था तालुक्याच्या ताब्यात मिळविता आली आहे. तर ‘यशवंत’ बाबत उच्च न्यायालयातूनच सभासदांनी लढाई लढवून संस्था सहकारात जिवंत ठेऊन संस्थेची निवडणूक लावून संस्था सभासदांच्या ताब्यात आणली आहे. आता ही संस्थाही ‘एनसीडीसी’ च्या पॅकेजच्या प्रतिक्षेत आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर मदतीची अपेक्षा आहे.
आता ‘घोडगंगे’बाबत मदत न केल्याची टिका अजित पवारांच्या विरोधात होत असेल तर दादांनी या टिकेला उत्तर देणे अपेक्षित आहे. अजित पवार यांच्यासोबत अनेक वर्षे राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या व आता फारकत घेतलेल्या आ. अशोक पवार यांच्या आरोपासह दोन सहकारी तत्वावरील कारखान्याचे भवितव्य अवलंबून असलेल्या या आरोपांत तथ्य काय ही उत्तरे मिळणे जनतेला अपेक्षित आहे.
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात थेट आरोप झाले आहे. मात्र राष्ट्रवादी एकसंध असताना अजित पवार यांना या कारखान्याच्या निवडणुकीला प्रचारास बोलावून कारखान्याची वाटचालीवर भाष्य करण्यात भाग पाडण्यात आले होते. मग या मुद्दात विरोधाभास असल्याने या मुद्दांवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देणे आवश्यक बनले आहे.
हवेलीत ‘यशवंत’ व बाजार समिती अस्तित्वाच्या घटका मोजत असताना अजित पवार हे पालकमंत्र्याच्या भूमिकेत होते, मग त्यावेळी त्यांच्यावर आरोप झाले नव्हते. मग विधानसभेच्या तोंडावर हे आरोप सुरू झाल्याने आरोपांचे स्पष्टीकरण जनतेला मिळणे अपेक्षित आहे. आता मतदारसंघ एक पण कारखाना बदलला आहे. मग अजित पवार या आरोपांवर ‘दूध का दूध पाणी का पाणी करणार का ‘ जनतेला उत्तर अपेक्षित आहे.