Shirur : चुलती व पुतण्याने गळफास घेऊन संपवले जीवन, घटनेने शिरूर हादरले..

Shirur : गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथे चुलती व पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने आसपासच्या परीसरात खळबळ उडाली आहे.

कल्पना रवींद्र शिंदे (वय. ३१) व सचिन दौलत शिंदे (वय. २४) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गणेगाव दुमाला येथील संगमेश्वर वस्तीवरील कल्पना रवींद्र शिंदे यांनी रविवारी (ता. ४) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असतानाच सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा पुतण्या सचिन दौलत शिंदे यानेही घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. Shirur
याप्रकणी शिरुर पोलीस ठाण्यात दौलत शिंदे व गोविंद शिंदे यांनी माहिती दिली आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संपत खबाले व पोलीस नाईक अमोल गवळी हे करीत आहेत.