Shirur : ठाकरेंचे एकनिष्ठ मावळा गेला! शिरूरसाठी मातोश्रीच्या आदेशाची वाट बघणारे अविनाश रहाणेंची अकाली एक्झिट..
Avinash Rahane's premature exit

Manchar मंचर : येथील कट्टर शिवसैनिक अॅड. अविनाश रहाणे यांचे आज सकाळी 7 च्या सुमारास एका खासगी रुग्णालयात निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने गेली अनेक वर्षे ते आजारी होते. Shirur

असे असताना मात्र, या जिगरबाजाची मृत्य़ूशी झुंज अपयशी ठरली. ते एक निष्ठावंत शिवसैनिक होते. 1999 मध्ये राज्याचे विद्यमान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात जेमतेम 8 हजारांनी पराभूत झाले होते.
नंतर अॅड. अविनाश रहाणे 2004 पासून माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यामागे भक्कमपणे उभे राहून खासदारकीची हॅट् ट्रिक करून आता 2024 मध्ये शिरूर लोकसभेसाठी आढळरावांनाच शड्डू ठोकून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाची वाट पाहत होते.

अॅड. अविनाश रहाणे यांनी गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघात चांगलीच पक्षबांधणी सुरू केली आहे. मात्र त्यांचे दुःखद निधन झाले आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने गेली अनेक वर्षे ते आजारी होते.
दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना शिवसेनेत घेण्यापासून स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांचे नियोजनही अॅड. रहाणे करत होते. यामुळे ते ठाकरेंच्या जवळचे मानले जात होते.
2004, 2009, 2014 या तीनही लोकसभा निवडणुकीत अॅड. रहाणे हे शिवाजीराव आढळराव यांचे प्रचारप्रमुख म्हणून राहिले व निवडणुका जिंकूनही दिल्या. यामुळे ते एक बडे नेते म्हणून ओळखले जात होते.