Shirur : आर तू निवडणूकच कसा येतो मी बघतोच अन् अमोल कोल्हेंनी विजय खेचून आणलाच, अजितदादांना धक्का…
Shirur : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि आजित पवार गट असे दोन गट पडले. त्यात शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना खासदारकीसाठी संधी देण्यात आली. मात्र, अजित पवार गटाला उमेदवार मिळत नव्हता.
त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना निवडून कसा येतो हे बघतोच असे चॅलेंज दिले होते. अमोल कोल्हेंनी देखील अजित पवार यांना जशाच तसं उत्तर देत हे चॅलेंज स्विकारलं होते.
अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. सातव्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांना 53949 मतांची आघाडी मिळाली आहे. Shirur
अजित पवार यांच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठा झटका मानला जातोय. अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. हे माझ्या एकट्याचं यश नाही, सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.
दरम्यान, लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कसा निवडून येतो बघतोच, असा सज्जड दम अजित पवारांनी दिला होता. अमोल कोल्हे यांनी हे आव्हान स्विकारलं होतं. आता लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे.