Shirur : ‘घोडगंगा’ आडचणीत आलाच कसा? कारखान्याचे व्यवहार पाहून कर्ज मिळते, तोंड पाहून नाही! संचालक दादा पाटील यांचा आरोप..!!


Shirur शिरुर : घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा राजकारणाचा अड्डा नाही, कारखाना अडचणी कसा गेला? कर्ज हे कारखान्याचे व्यवहार पाहून मिळते ,तोंड पाहून नाही? कारखाना बंद पडण्यात अशोक पवारच जबाबदार असल्याची टिका घोडगंगा कारखान्याचे संचालक दादापाटील फराटे यांनी केली आहे.

शिरुर येथे पत्रकारांसोबत बोलत असताना ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीकरीता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे मागितली आहे. उमेदवारी मिळाल्यास निवडणूक ताकदीने लढविल व घोडगंगा सहकारी साखर चालू करण्याबाबत प्राधान्य राहील असे फराटे म्हणाले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार ॲड. अशोक पवार यांच्या कडून आपण अजितदादा पवार गटात न गेल्याने कारखान्याचा कर्जाचा संदर्भातील निर्णय होत नाही असा आरोप केला होता या पार्श्वभूमीवर संचालक दादापाटील फराटे यांनी पवार यांचा आरोप खोडून काढला आहे.
ते म्हणाले, अजितदादा पवार यांच्यावर जे आरोप सुरु आहेत ते सर्व खोटे आहेत.

कारखान्याचा कर्जाचा प्रस्ताव हा वेळेत सादर करावा लागतो व त्यात काही त्रुटी असतील तर वेळेत त्रुटी दुरुस्त करुन प्रस्ताव सादर करावा लागतो. कर्ज तोंड पाहून नाही तर व्यवहार व फाईल पाहून कर्ज दिले जात नाही. त्रुटी दूर करायचा नाहीत व आरोप करायचे हे बरोबर नाही असे फराटे यांनी स्पष्ट केले.

२५ वर्ष कारखान्याची एकहाती सत्ता असताना व उसाचे मोठे क्षेत्र कारखाना कार्यक्षेत्रात असतानाही घोडगंगा कारखाना अडचणीत का असा सवाल फराटे यांनी उपस्थित केला. खाजगी साखर कारखानावर निष्ठा ठेऊन तो सुस्थितीत ठेवायचा आणि सहकारी कारखान्याशी गद्दारी करायची असा प्रश्न फराटे उपस्थित केला.

शिरुरची विकासकामे दादांमुळे मार्गी…

शिरुर तालुक्यातील विविध विकासकामे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मार्गी लावली आहेत. दादांच्या विचारांना माननारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिरुर मध्ये असल्याने दादांचा विचाराचा उमेदवार शिरुर मधून विजयी होईल असा विश्वास व्यक्त करीत घोडगंगा साखर कारखान्याचा आजच्या परिस्थितीचा अजितदादा पवार यांच्यावर ठपका ठेवू नका. घोडगंगाचा आजच्या परिस्थितीला ॲड. अशोक बापू पवार जबाबदार असल्याचे फराटे यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!