Shirur : अनधिकृत बांधकामांवर पुन्हा कारवाई होणार? सणसवाडीतील बेकायदा बांधकामांची पीएमआरडीए कडून पाहणी…
Shirur पुणे : राज्यात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता सणसवाडी (ता.शिरूर) येथील ज्या-ज्या बेकायदा बांधकामांच्या तक्रारी आमचेकडे आल्या आहेत त्या सर्व बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी, शेजारील बांधकामांची पाहणी तसेच त्या-त्या भागातील सर्व बेकायदा बांधकामांचे प्राथमिक सर्व्हेक्षण नुकतेच पूर्ण केले.
संबंधितांना नोटीस बजावल्याची माहिती पीएमआरडीएचे विभाग अभियंता सुनिल पवार यांनी दिली. यामुळे याबाबत कारवाई होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आम्ही तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही तात्काळ करीत असल्याचे तहसिलदार मनिषा तेलभाते यांनी सांगितले.
याबाबत आम्ही वेळोवेळी आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही तात्काळ करीत असल्याचे तहसिलदार मनिषा तेलभाते यांनी सांगितले. तब्बल १४ नवीन नगरे (वस्त्या) तयार झालेल्या सणसवाडीची बजबजपुरी होवू नये म्हणून स्थानिक ग्रामपंचायतीकडून पीएमआरडीएला कळविण्यात आले आहे. काही बेकायदा बांधकामांना ग्रामपंचायतीने नोटीसाही बजावलेल्या आहेत.
याच पार्श्वभूमिवर पीएमआरडीए कडून आता तक्रार आलेल्या बांधकामांची पाहणी करणे सुरू असून सदर बांधकांच्या परिसरात, शेजारी आणि लगतच्या बांधकामांचीही माहिती पीएमआरडीएकडून घेण्यात आली आहे. याबाबत सणसवाडी स्थानिक ग्रामपंचायतीकडून पीएमआरडीएला कळविण्यात आले आहे. काही बेकायदा बांधकामांना ग्रामपंचायतीने नोटीसाही बजावलेल्या आहेत.
यामुळे याबाबत पीएमआरडीए कडून आता तक्रार आलेल्या बांधकामांची पाहणी करणे सुरू असून सदर बांधकांच्या परिसरात, शेजारी आणि लगतच्या बांधकामांचीही माहिती पीएमआरडीएकडून घेण्यात आली आहे. Shirur
वरिष्ठांकडून ज्या पध्दतीने सुचना येतील तशी कारवाई आमच्या बेकायदा बांधकाम कारवाई विभागाकडून केली जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच स्थानिक ग्रामपंचायतीनेही काही बेकायदा बांधकामांना नोटीसा बजावल्याने सणसवाडीतील बेकायदा बांधकामांबाबतचा प्रश्न पीएमआरडीएसाठीही आव्हान ठरत आहे. यासाठी एक मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलप केले आहे.