शिराळा तालुका भूकंपाने हादरला! ३ रिस्टर स्केल भूकंपाचा धक्का..!!


सांगली : शिराळा तालुक्यात आज सकाळी ६:४७ वाजता ३ रिस्टर स्केलचा भूकंप झाला आहे. हा भूकंप साडेसात सेकंद जाणवला असून त्याचा केंद्रबिंदू चांदोली धरणा पासून १४.४० किलोमीटर वर होता. २ फेब्रुवारी २०११ पासून ३ रिस्टर स्केल वरील झालेला हा ९० वा भूकंप आहे.

यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. तसेच चांदोली धरणास कोणताही धोका झालेला नाही अशी माहिती शाखाधिकारी गोरख पाटील यांनी दिली आहे.

दि.१६ ऑगस्ट रोजी सकाळी ६:३५ वाजता सौम्य ३.२ रिस्टर स्केलचा भूकंप जाणवला होता. त्याचा केंद्रबिंदू चांदोली धरणा पासून १५.२ किलोमीटर वर होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!