ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचीं खेळी; मनपा निवडणुकीसाठी बी प्लॅन आखत भाजपलाही दणका….


पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाने जोरदार खेळी खेळली आहे.शिंदे गटाने आपला प्लॅन बी सुरू केला असून ठाकरेंसह भाजपही अडचणीत येण्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपकडून 150 जागा लढवण्याची तयारी सुरू आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाकडून किमान 100 जागांची मागणी केली जात असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे ठाकरेंसह भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने प्रभाग पातळीवर आपली ताकद वाढवण्यासाठी आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली आहे. किरकोळ कामे सुरळीत व्हावीत आणि स्थानिक पातळीवर नाराजी वाढू नये, यासाठी नुकतेच शिंदे गटात दाखल झालेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात महापालिकेतर्फे विशेष निधी उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी ठाकरे गटातील माजी नगरसेवकांना आपल्या गटात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 100 हून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांना धक्का बसला आहे.

दरम्यान 2017 मध्ये ठाकरेंकडून निवडून आलेल्या सुमारे 45 नगरसेवकांचा समावेश आहे. यशवंत जाधव, समाधान सरवणकर, शितल म्हात्रे, राजुल पटेल आणि राजू पेडणेकर यांसारखे माजी नगरसेवक या यादीत आहेत. येत्या काही दिवसांत आणखी काही माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!