शिंदेंच्या खासदाराचा जमिनीसाठी कोट्यवधीचा घोटाळा ; अंबादास दानवे यांच्या आरोपाने खळबळ…


पुणे : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. अशातच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेंचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर कोट्यवधींचा जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, शिंदेंचे खासदार संदिपान भुमरे यांनी समृद्धी महामार्गावरील जटवाडा परिसरातील 23 एकर 30 गुंठे जमीन ड्रायव्हरच्या नावे करून बळकावल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.त्यांच्या आरोपानुसार, संबंधित जमीन संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्या नावावर करण्यात आली आहे..या प्रकरणात सविस्तर कागदपत्रांसह मुख्यमंत्री यांना पत्र लिहून सीआयडी चौकशीची मागणी केल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे.

शिंदेंचे खासदार संदिमान भुमरे यांनी जमिनी संबंधित केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.ते म्हणाले की, आपल्यावर जो आरोप करण्यात आला आहे तो चुकीचा आहे. तसा कोणताही हिबानामा झालेला नाही. जावेद रसुल हा माझा ड्रायव्हर आहे, पण त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. दानवे यांनी त्यांचे आरोप सिद्ध करून दाखवावं असे त्यांनी म्हटलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या जमिनीच बक्षीस पत्र 1971 साली झाल्याच्या दाखवलं जात आहे, मात्र जावेद रसुल शेख याचा जन्म 1985 मध्ये झाल्याचा दावा दानवे यांनी केला. त्यामुळे 1971 मध्ये त्याच्या नावावर बक्षीस पत्र कस होऊ शकत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!