हनी ट्रॅपच्या माध्यमातूनच शिंदेंचं सरकार सत्तेत आलं; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने खळबळ


पुणे : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं सरकार हनी ट्रॅपच्या माध्यमातून सत्तेवर आल्याचा खळबळजनक दावा केला आहे.त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार उलथवून सत्तेवर आलेलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार हनी ट्रॅपच्या माध्यमातूनच स्थापन झालं, असा गौप्यस्फोट विजय वडेट्टीवार यांनी केला आहे., ‘काल हनी नाही आणि ट्रॅपही नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण याबाबत मोठी माहिती सरकार आणि विरोधकांकडे आहे. जे काही अधिकारी आहेत. आजी – माजी मंत्री आहेत. यात खूप बड्या व्यक्तींचा समावेश आहे असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, कुणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा अधिकार कुणालाही नाही. पण शिंदेंचं जे सरकार आलं, जी काही सत्तापालट झाली, ती सीडीमुळे झाली. एवढं मोठं ते प्रकरण आहे. यावर अधिक बोलण्याची गरज नाही. जेव्हा दाखवू तेव्हा तिकीटच लावावं लागेल. तिकीट लावूनच चित्र दाखवावं लागेल’, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!